
कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कारागृह प्रशासनानेदेखील कैद्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. कैद्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी हायरिस्क वयोगटात असलेल्या कैद्यांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील जवळपास 181 कैद्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
राज्यात सध्या विविध कारागृहांमध्ये सुमारे 15 हजार 739 कैदी आहेत. त्यापैकी 181 कैद्यांना लस देण्यात आली असून अजून 15 हजार 553 कैद्यांना लस देणे बाकी आहे. आर्थर रोड कारागृहातील 39, ठाणे कारागृहातील 40 तर येरवडा कारागृहातील 81 कैद्यांना लस देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन व कोर्टाच्या आदेशानुसार कैद्यांना लस देण्यात यावी, असे आदेश कारागृह विभागाचे अतिरिक्त पेलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिले आहेत. त्यानुसार कारागृह अधीक्षक विविध परवानग्या व स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन कैद्यांना लसीकरण करीत आहेत.






























































