राज्यात दारूबंदी करणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यात दारूबंदी करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. मात्र चंद्रपूर जिह्यातील दारूबंदी मागे घेतली जाणार नाही, अशी माहिती उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. आमदार विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. चंद्रपुरात मोठय़ा प्रमाणात दारू मिळते आणि महाराष्ट्राबाहेरून दारू राज्यात येऊन ती अवैधपणे विकली जात आहे. सोमवारीच १ कोटी ३४ लाख रुपयांची दारू पकडली असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राबाहेरून अवैध दारू राज्यात येते. त्यावर नियंत्रण करण्यासाठीच ग्रामरक्षक दलाचा कडक कायदा शासनाने केला आहे. उत्पादन शुल्क विभागाची दारूबंदीबाबत आणि अवैध दारूबाबत कडक कारवाई केली.