
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
सकाळी सात वाजल्यापासून रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतुक ठप्प आहे.
गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ५७.६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये मंडणगड- ५२.००मिमी, दापोली- २५ मिमी, खेड- ५२मिमी, गुहागर-६ मिमी, चिपळूण-८० मिमी, संगमेश्वर-७५ मिमी, रत्नागिरी-५२ मिमी, लांजा ९४ मिमी आणि राजापूर तालुक्यात ८८ मिलीमीटर पाऊस पडला.
































































