बदलापुरात भटक्या कुत्र्यांचा चिमुरडीवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घराबाहेर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना कासगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

अंबरनाथ तालुक्यातील कासगाव येथे राहणारी ओकी राणे दुपारी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी चार ते पाच भटक्या श्वानांनी तिच्यावर अचानक हल्ला केला. ओवीच्या ओरडण्याचा आकाज ऐकून स्थानिकांनी धाव घेत श्वानांना हुसकावून लावले. त्यानंतर ओकीला तातडीने बदलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ओकीची प्रकृती स्थिर झाली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भटक्या श्वानांबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.