पणदूर विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

वेताळबांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूरतिठा या प्रशालेत इयत्ता १० वी व १२ वी विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्था चेअरमन शशिकांत अणावकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.

यावेळी संस्था सचिव आपा गावडे, संचालक व जि.प.सदस्य नागेंद्र परब, कांदळकर, सौ.रिना सावंत, बबन कदम, आवळेगांव सरपंच सुनील सावंत, मुख्याध्यापक संजय मालवणकर आदींसह संस्था पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

अणावकर म्हणाले की, विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत व्हावा. शिक्षणप्रवाहातून बाहेर पडताना त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा. कौशल्य प्राप्त करावे या हेतूने संस्था कार्यरत असते. विविध शैक्षणिक सुविधा प्राप्त करून संस्था अद्ययावत शिक्षण देत असल्याने प्रशालेचा निकाल उंचावत आहे. यावेळी जि.प.सदस्य परब व अन्य उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात इ. १० वी मध्ये प्रथम सायली सखाराम सावंत, द्वितीय ऋषिकेश गुरूनाथ भट्टगांवकर व तृतीय पार्थ कैलास राऊत, इ. १२ वी मध्ये कला शाखा – प्रथम अंजली महादेव म्हाडदळकर, द्वितीय आशुतोष नंदकिशोर गंगावणे, तृतीय वैभव अनिल परब, वाणिज्य शाखा – प्रथम शितल काशिनाथ सोनार, द्वितीय रिद्धी नारायण पालव, तृतीय प्लाईवन फर्नांडिस, विज्ञान शाखा – प्रथम सुस्मिता गणेश चव्हाण, द्वितीय शितल श्रीपाद गुरव, तृतीय निधी महादेव कदम तसेच इ.१२ वीत अकौंटन्सी विषयात व इ.१० वीत गणित व समाजशास्त्र विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या वतीने पी.एन.ओऊळकर तर विद्यार्थ्यांच्या वतीने सायली सावंत व ऋषिकेश भट्टगांवकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक मालवणकर यांनी केले तर पर्यवेक्षक एम.जी.कर्पे यांनी आभार मानले.