कॉपीच्या संशयावरुन विद्यार्थीनीला कपडे उतरवायला भाग पाडले, पिडितेने केला आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉपी केल्याच्या संशयातून शिक्षिकेने कपडे उतरवायला लावल्याने दु:खी झालेल्या नववीच्या विद्यार्थीने रॉकेल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यात ती गंभीर भाजली असून तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. तिथून तिला टीएमएच रुग्णालयात हलविण्यात आले. विद्यार्थीनी 80 टक्के जळाली असून ती गंभीर अवस्थेत आहे.

झारखंडच्या जमशेदपूर येथील छायानगर येथील ही घटना असून ती साकसी येथे ती शाळेत जाते. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थीनी घरी गेली आणि शुक्रवारी सायंकाळी 5 च्या दरम्यान तिने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. शाळेत परिक्षे दरम्यान कॉपी करत असल्याच्या संशयावरुन विद्यार्थीनीला कपडे काढायला भाग पाडले होते.

या घटनेने संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थांनी शाळेत पोहोचून गोंधळ घातला. त्यांनी शिक्षिकेविरोधात कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी टीएमएच रुग्णालयात शाळेत पोहोचून जबाब घेतला आहे. विद्यार्थीनिने दिलेल्या माहितीनुसार शिक्षिकेने सर्वांसमोर कपडे उतरवले आणि बेदम पोहोचले. त्यामुळे दु:खी झालेल्या मुलीने स्वत:ला आग लावून घेतली. तसेच तिने सांगितले की, तिने कॉपी केली नाही. तर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थीनी शाळेत कॉपी करत होती. तिला त्यावेळी फक्त तंबी देण्यात आली होती. मात्र तिचे कपडे उतरविण्याबाबत त्यांना काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

पिडीतेच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्यांची मुलगी शुक्रवारी परिक्षा देऊन घरी आली. ती फार निराश दिसत होती. त्यानंतर तिने शाळेच्या कपड्यांवरच रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये ती 80 टक्के जळाली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच कपडे उतरविण्याबाबत तिच्या मैत्रीणीने सांगितले होते. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी शिक्षिकेविरोधात कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी सीतारामडेरा पोलीस तपास करत आहेत.