
राज्य गुप्तचर विभागातून पह्न टॅपिंग डेटा लीक झाला होता. त्याप्रकरणी राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक व सध्याचे सीबीआय संचालक सुबोध जायस्वाल यांचीही चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने जायस्वाल यांना समन्स बजावले आहे. 14 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
सुबोध जायस्वाल यांना ई-मेलवरून हे समन्स पाठवण्यात आले आहे. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना रश्मी शुक्ला यांनी पोलीस दलातील बदल्या आणि बढत्यांबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि खासगी व्यक्ती यांच्यात पह्नवरून झालेले संभाषण टॅप करून अहवाल बनवला होता. तो गोपनीय अहवाल लीक झाला होता. त्याप्रकरणी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्याची चौकशीही सुरू आहे. रश्मी शुक्ला यांचाही याप्रकरणी जबाब नोंदवला गेला आहे.
सुबोध जायस्वाल यांना चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. जायस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेल्या मे महिन्यापासून ते सीबीआय संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर आहेत.

































































