
राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाचा सुदेश मयेकर यांनी राजीनामा दिला.काही महिन्यापूर्वीच त्यांची एन्जोप्लास्टी झाली होती.त्या आजाराचा त्रास वाढू लागल्याने आपण ज़िल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे सुदेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
साडेचार महिन्यापूर्वी सुदेश मयेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली होती.त्यानंतर त्यांनी जिल्हाभर दौरे करून संघटन बांधणीचे काम केले.मात्र प्रकृतीच्या कारणांमुळे आपण आता जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असून पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता म्हणून रत्नागिरी शहर आणि तालुक्यात कार्यरत रहाणार आहे. पक्षाने जर संधी दिली नगरपरिषदेची नगराध्यक्षपदाची किंवा रत्नागिरीतून विधानसभेची निवडणूक लढवू अशी आशा मयेकर यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, 2019 ला मी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रत्नागिरी विधानसभेची निवडणूक लढलो होतो. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत पक्ष होता. आमचा एकही सरपंच नव्हता. शहरात फक्त मी एकमेव नगरसेवक होतो. माझ्या विरोधात 32 नगरसेवक होते. तरीही मला शहरात 10 हजार 700 मते मिळाली.विरोधकांना त्यांची ताकद असूनही 17 हजार 500 मते मिळाली. मतदारसंघात मला 31 हजार मते मिळाली म्हणजे आम्ही आमची ताकद दाखवली होती.त्यामुळे प्रकृतीने साथ दिली तर आगामी नगराध्यक्षपद किंवा विधानसभेची निवडणूक लढवू अशी आशा सुदेश मयेकर यांनी व्यक्त केली.


























































