निफाड तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

निफाड तालुक्यातील औरंगपूर शिवारात गुरुवारी सकाळी 41 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

भाऊसाहेब शिवाजी खालकर असे त्यांचे नाव आहे. त्यांची औरंगपूर शिवारात गट क्रमांक 57 येथे शेतजमीन आहे. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी शेताजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस पाटील संजय चाबुकस्वार यांनी दिलेल्या माहितीवरून सायखेडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

खालकर यांच्यावर बँकेचे, तसेच हातउसने घेतलेले कर्ज होते. कर्जफेड करणे अशक्य झाल्याने तणावाखाली त्यांनी हे पाऊल उचलले.