गँगस्टर सुक्खाची गोळय़ा घालून हत्या, लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली हत्येची जबाबदारी

कॅनडात लपून बसलेला गँगस्टर सुखदूल सिंह ऊर्फ सुक्खा दुनुकेची गुरुवारी गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. सुक्खाचा मोस्ट वॉण्टेड गुन्हेगारांच्या यादीत समावेश होता. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (एनआयए) ने नुकतीच ही यादी जारी केली होती. हल्लेखोरांनी सुक्खाच्या डोक्यात 9 गोळय़ा झाडल्या. सुक्खाच्या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली आहे. गँगस्टर सुखदूल सुक्खा दुनुके खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह ऊर्फ अर्श डालाचा उजवा हात होता. कॅनडात राहून तो हिंदुस्थानातील आपल्या साथीदारांद्वारे गुन्हेगारी करीत होता. हत्यावेळी तो कॅनडाच्या विनिपेग शहरातील हेजल्टन ड्राइव्ह रोडवरील कॉर्नर हाऊसच्या फ्लॅट नंबर 203 मध्ये राहत होता. सुक्खा 2017 साली बनावट कागदपत्रांच्या मदतीने पासपोर्ट बनवून हिंदुस्थानातून कॅनडात पळाला होता.