
नावापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा चित्रपट ‘आत्मपॅम्फ्लेट’ 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. परेश मोकाशी लिखित, आशीष बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाबाबत प्रेक्षक जितके उत्सुक आहेत तितकेच सिनेसृष्टीतील कलाकारही उत्सुक आहेत आणि याला बॉलीवूडचे कलाकारही अपवाद नाहीत.
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल यांनीही सोशल मीडियावरून आपला लहानपणीचा फोटो शेअर करत ‘आत्मपॅम्फ्लेट’ला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. सनी देओल यांनी शेअर केलेल्या स्टेटसमध्ये त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, ‘बचपन की यादें हमेशा ही मन को लुभाती हैं! और ऐसी ही यादों से जुडा ‘आत्मपॅम्फ्लेट’ लेकर आ रहा है आशीष, असे म्हणत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. यावरूनच बॉलीवूडलाही ‘आत्मपॅम्फ्लेट’ची भुरळ पडल्याचे कळतेय.
गुलशन कुमार, टी. सीरिज फिल्म्स, कलर यल्लो प्रॉडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या डार्क कॉमेडी चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.