
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्यावर आधारीत ‘करणजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ ही वेब सीरिज सुरू झाली आहे. या वेब सीरिजमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वेब सीरिजमध्ये एक पंजाबमधील साधारण घरातील करणजीत कौर सनी लिओनी कशी बनली याचा प्रवास दाखवण्यात येत आहे. सीरिजमध्ये अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत.
जी ५ या चॅनेलवरून प्रसारित होणाऱ्या या सीरिजमध्ये एक दृष्य सनी लिओनीने पहिल्यांदा ब्लू फिल्म कधी पाहिली यावर चित्रीत करण्यात आले आहे. पहिल्यांदा पॉर्न फिल्म पाहिल्यानंतर सनी लिओनी संकोचते आणि ढसा-ढसा रडायला लागते. यानंतर शिखांचे श्रेष्ठ गुरु गुरुनानक यांच्या फोटोसमोर हात जोडून उभी राहते आणि बाबा जी मला माहीत नव्हते, माझ्याकडून चुकी झाली, असे म्हणते. या दृष्यावरून कल्पना येते की सनी लिओनी इतर मुलींसारखेच बालपण जगली परंतु त्यानंतर पैसे कमावण्यासाठी पॉर्नोग्राफीमध्ये गेली.



























































