‘वंदे भारत’ची सुपरफास्ट पार्सल सर्व्हिस धावणार; दिल्ली ते मुंबईदरम्यान चालविण्याची योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vande-bharat-express

सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ला मिळालेल्या यशानंतर आता तिची मालगाडी स्वरूपाची पार्सल सर्व्हीस चालविण्याची योजना रेल्वे बोर्डाने तयार केली आहे. त्यामुळे मालवाहकतूक दर ताशी 100 कि.मी.च्या वेगाने चालविणे शक्य होणार असून लवकरच तिचा पहिला रेक दाखल होणार आहे. वंदे भारत धर्तीची ईएमयू फ्रेट ट्रेन चालविल्याने इंजिन बदलण्याचा आणि तसेच नाशवंत कृषी उत्पादनांची वाहतूक करणेही शक्य होणार आहे.

रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला पत्र लिहून वंदेभारत फ्रेट ट्रेन चालविण्याची योजना तयार करण्यास सांगितले आहे. या वंदे भारत पार्सल सर्व्हीसची प्रति तास 160 कि.मी. वेगाने धावण्याची क्षमता असेल. मालगाड्यांना जादा डबे असतात. परंतू या गाडीला 16 डबेच असतील, यावर 264टन वजन पेलणारे पार्सल कोच फिट केलेले असून 1800 एमएम रूंदीचे ऑटोमेटीक स्लायडींग डोअर या गाडीच्या कोचला बसविलेले असतील. डेडीकेटेट फ्रेट कॉरीडॉरचे काम अंतिम टप्प्यात असून तो पुर्ण झाल्यावर मालवाहतुकीला प्रचंड वेग येईल असे म्हटले जात आहे.

सध्या चार वंदे भारत ट्रेन सुरू आहेत…
दिल्ली-एनसीआर सेक्शन आणि मुंबई सेक्शन मध्ये पहिली वंदे भारतची पार्सल सुरू करण्याची योजना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली ते हिमाचल प्रदेश धावणार्‍या चौथ्या वंदे भारतला गुरूवारी हिरवा झेंडा दाखविला. नुकतिच मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे. त्याच्या आधी दिल्ली ते वाराणसी व दिल्ली ते काटरा अशा वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत.