हैदराबाद एन्काउंटरबाबत सरन्यायाधीशांची मोठी प्रतिक्रिया…वाचा सविस्तर

2713

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी हैदराबाद एन्काउंटरप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी या घटनेबाबत आक्षेप नोंदवला आहे. न्याय कधीही घाईगडबडीत करण्यात येत नाही. बदल्याच्या किंवा सूडाच्या भावनेतून करण्यात आलेला न्यायदेखील अयोग्यच असतो. तसेच अशा न्यायाला नैतिकतेचे अधिष्ठान नसते, असे सरन्यायाधीश बोबडे यांनी स्पष्ट केले. जोधपूरमधील राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसादही उपस्थित होते.

हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना शुक्रवारी एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आले. घटनेच्या नाट्यरुंपातरासाठी आरोपींना शुक्रवारी घटनास्थळी नेल्यावर त्यांनी पोलिसांची शस्त्रे हिसकावत पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत चारही आरोपी ठार झाले. या घटनेबाबत देशभरातून काही जणांनी पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर काहीजणांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या घटनेवर आता सरन्यायाधीशांनीही त्यांचे मत नोंदवले आहे. घाईगडबडीत आणि सूडाच्या भावनेतून केलेला न्याय अयोग्य असून त्याला अधिष्ठान नसल्याचे सरन्यायाधीश बोबडे म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या