
चंदीगड महापौर निवडणूक चिटिंग करून भाजप जिंकली होती. त्या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीवरून पीठासीन अधिकाऱयाला चांगलेच धारेवर धरले होते. मंगळवारी स्वत: सर्वोच्च न्यायालयाने अधिकाऱ्याने अवैध ठरवलेली मतं तपासत ती वैध ठरवली आहे. तसेच न्यायायलयाने भाजपला धक्का देत चंदीगडच्या महापौरी पदी आपचे कुलदीप सिंग विजयी घोषीत केले आहे.
सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांनी अधिकाऱ्याने खाडाखोड करून रद्द केलेले सर्व पत्रिका वकीलांना दाखवल्या व त्यावरील मतं ही कुलदीप सिंग यांनाच आल्याचे सांगितले. त्यांनी रद्द करण्यात आलेली सर्व मतं वैध ठरवल्याने कुलदीप सिंग यांची एकूण मतं 20 झाली असून त्यांना विजयी घोषीत केली आहे.


























































