
मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यास विलंब लागत असून त्याचं नैराश्य आता मिंधे-फडणवीस सरकारला येऊ लागल्याचं दिसत आहे. त्यामुळेच आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्याऐवजी आता दोषारोप होताना दिसत आहे. मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवार यांनी केला, असा आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आरक्षणाच्या बाबतीत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसने जी भूमिका घेतली आहे, ती राज्याच्या हिताची नाही. मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवार यांनी केला, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बातमीची हेडलाईन करण्यासाठी फडणवीसांना शरद पवारच लागतात. गेली 10 वर्षं गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे, तरीही शरद पवारांवर टीका करण्यात येते, असं सुळे आपल्या प्रत्युत्तरात म्हणाल्या आहेत.



























































