महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, लवकरच शिक्कामोर्तब – सुप्रिया सुळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. बाकी फॉर्म्युला मागच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनीया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. तिथे अनौपचारीक चर्चा झाली आहे आता औपचारीक शिक्कामोर्तब पुढच्या आठ ते दहा दिवसात होईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्राचा विकास संथगतीने

राज्य सरकारवर निशाणा साधत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्यापद्धतीने महाराष्ट्रातली उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. महाराष्ट्रावर अन्याय जो होतोय आज केंद्र सरकारचा दोन दिवसांपूर्वी जो डेटा आला होता त्यामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहार ही राज्य अनेक सामाजिक कार्यक्रमांसाठी महाराष्ट्राच्या पुढे आहेत. विकासाचा दर असेल, गुंतवणुक असेल किंवा वातावरण हे महाराष्ट्रापेक्षा बऱ्याच राज्यांमध्ये जास्त आहे. असाच केंद्र सरकारचाच डेटा दाखवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असलेल्या ट्रीपल इंजिन खोक्याचे सरकार आहे, त्यांच्याकडे जरी 200 आमदार असतील तरी 200 आमदारांच्या मानाने विकास संथगतीने होताना दिसत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. पाण्याचा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे पाणी, अतिवृष्टी आणि दुष्काळ हे अतिशय गंभीर आव्हान राज्य आणि देशासमोर असल्याचे मला वाटतं. त्यामुळे राज्यकर्त्यांनी जातीने लक्ष घालून थोडावेळ राजकारण बाजूला ठेवून ज्याच्यासाठी ते म्हणतात सत्तेत आले त्याच्यात लक्ष घालणं अतिशय महत्वाचं असल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

देवेंद्र फडणवीस जेव्हापासून गृहमंत्री झाले तेव्हापासून क्राईम वाढले

गृहखातं काय करतंय?सायबर क्राईमचे जे विषय आहेत ते गृहखात्याच्या अखत्यारित येतात आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी असे एक बिल केंद्र सरकारने एक नवीन क्रिमिनल लॉ बद्दलचे महत्वाचे दिल्लीत विधेयक पास केले. ज्यामध्ये फोन टॅपिंग अधिकृत करुन टाकले. त्यामुळे देशामध्ये प्रायवसी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आता कमी कमी होताना दिसतेय. त्यामुळे दुर्देव्य आहे की एकीकडे दडपशाही सारखे निर्णय होत आहेत आणि आजकालची नवीन पिढी जे ऑफिशली पारदर्शकपणे मतं मांडतात त्यांचे अकाऊंट हॅक केले जाते यात अर्थातच हे गृहमंत्रालयाचे अपयश दिसतय, देवेंद्र फडणवीस जेव्हापासून गृहमंत्री झाले तेव्हापासून क्राईम वाढले असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली.

महाराष्ट्र पोलिसांच्या बदल्यांमध्ये राजकारण होत असेल तर दुर्देव

महाराष्ट्र पोलिसांच्या बदल्यांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्र पोलिसांच्या सातत्याने बदल्या करण्यात येत आहेत. जेव्हा तुम्ही बदल्यांमध्ये एवढी गडबड करता त्या सरकारमध्ये निष्ठेने काम करणाऱ्या लोकांचा मनोबल असते ते कमी होते. माझे महाराष्ट्राच्या पोलिसांवर पूर्ण प्रेम, आदर आणि विश्वास आहे आणि त्यांच्या बदल्या, प्रमोशनमध्ये असं जर राजकारण होत असेल तर हे अतिशय दुर्देवी आहे. आदर्श म्हणून आजची युवापिढी पोलिसमध्ये जाते त्याला तुम्ही काय आदर्श घालून देणार? त्यामुळे राजकारण बाहेर ठेवत पोलिसांना पारदर्शकपणे संविधानाच्या चौकटीत राहून या ट्रिपल इंजिनच्या खोकेसरकारने काम करु दिले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

हे वर्ष राजकीय, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या खूप महत्वाचे

जगामध्ये अनेक देशांमध्ये यंदा निवडणुका आहेत. त्यामुळे संविधानाप्रमाणे निवडणुक व्हावी जी पारदर्शक व्हावी. आपल्या देशामध्ये जगात अनेक ठिकाणी दडपशाही आहे ती कुठेतरी थांबून पारदर्शकपणे स्वातंत्र्याने आपल्याला सगळ्यांना मोकळा श्वास घेता आलं पाहिजे. हे आपण सर्वांनी या वर्षात करायचे आहे. राज्यातली, देशातली आणि अनेक महत्वाच्या जगातली निवडणूक आहे ज्याचा प्रभाव सगळ्याच गोष्टीवर असतो. अर्थकारणावर असतो, निर्णयप्रक्रियेत, जागतिक रिलेशनशिपवर असतो. त्यामुळे हे वर्ष राजकीय, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या खूप महत्वाचे असणार आहे.