मानलेल्या भावाने जबरदस्तीने लग्न केलं, मित्रांसोबत केला सामूहिक बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

गुजरात येथील सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी हा पीडितेचा मानलेला भाऊ आहे. त्यानेच मित्रांसोबत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे.

सूरतच्या डिंडोली परिसरात पीडिता राहते. आरोपी तरुणासोबत पीडितेच्या आई-वडिलांनी तिचा विवाह ठरवला होता. मात्र, पीडितेला हे लग्न मान्य नव्हतं. ती जवळपास दीड वर्षापूर्वी एका ओळखीच्या तरुणासोबत सूरत शहरात पळून आली होती. तेव्हापासून तिने आरोपी तरुणाला आपला भाऊ मानलं होतं.

मात्र, आरोपीने तिचा ठावठिकाणा शोधून काढला. तिच्या भांगात जबरदस्तीने कुंकू भरलं आणि तिच्यासोबत नवऱ्याप्रमाणे राहू लागला. या काळात त्याने तिच्यावर बलात्कार केला. या काळात आरोपीने तिला त्याच्या मित्रांना सोपवलं. त्या दोन मित्रांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिने या आधी पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी तिला दाद दिली नाही. आता या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.