७ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने सफाई कर्मचार्‍याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बंगळूरू

बंगळूरू महानगर पालिकेतील सुब्रमणि या सफाई कर्मचार्‍याने गेल्या ७ महिन्यांचा पगार न मिळाल्याने आत्महत्या केली आहे. गेली १५ वर्षे सुब्रमणि पालिकेत सफाई कर्मचारी पदावर कार्यत होते. गेले ७ महिने पगार न मिळाल्याने सुब्रमणि आर्थिक संकटात सापडले होते. या आर्थिक विवंवचनेतून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.

सुब्रमणिच्या आत्महत्येला महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचे त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितले. सुब्रमणि यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहली असून त्यांच्याकडे कुटुंबाला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याचे नमूद केले होते. गेले सात महिने सुब्रमणि बंगळूरू पालिकेकडे आपल्या वेतनासाठी याचना करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार पैसे नसल्याने सुब्रमणि यांनी आपल्या मुलांना शाळेतूनही काढले होते. सुब्रमणि हे वॉर्ड क्रमांक ७७ मध्ये कार्यरत होते. रविवारी या सगळ्याला कंटाळून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या पत्नीने त्यांना जनरल इस्पितळात दाखल केले, तिथे सुब्रमणि यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पुढील तपास आणि कारवाई पोलिस करत आहेत. तर महानगरपालिकेच्या युनियनने पालिकेच्या अधिकार्‍यांना अटक व्हावी अशी मागणी केली आहे.