आरोग्य केंद्रातील टॅब चोरट्याने लांबवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोगेश्वरी येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील टीबी रूममधील टॅब चोरटय़ाने लांबवला आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार हे पालिकेच्या के पूर्व विभागात काम करतात. जोगेश्वरीच्या सर्वोदय नगर येथे पालिकेचे आरोग्य केंद्र आहे. आरोग्य केंद्रातील टीबी रूममध्ये एक टॅब ठेवला होता. गुरुवारी सायंकाळी त्या केंद्राच्या गेटचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत एका कर्मचाऱयाला दिसले. टीबी रूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तेथे टॅब नसल्याचे कर्मचाऱयाच्या लक्षात आले. आरोग्य केंद्राच्या भिंतीबाहेर आरोग्य केंद्राची काही पुस्तके आणि जुनी रद्दी पडलेली दिसली. याची माहिती त्या कर्मचाऱयाने तक्रारदारांना दिली. त्याने या घटनेची माहिती मेघवाडी पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले. मेघवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस त्या चोरटय़ाचा शोध घेत आहेत.