तबलावादनाने उस्ताद शफात यांना मानवंदना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ तबलानवाज शफात अहमद खान यांना पंचम निषादतर्फे सांगीतिक आदरांजली वाहण्यात येणार आहे. ही मैफल येत्या सोमवारी २४ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजल्यापासून दादर येथील शिवाजी पार्कच्या सावरकर सभागृहात रंगणार आहे. या मैफलीत १५ वर्षांचा तरुण वादक केशवा याचे एकेरी तबलावादन होणार असून सोबत कौशिकी चक्रवर्ती यांचे गायनही ऐकायला मिळेल. केशवाला सुधांशू घारपुरे संवादिनीची साथ करणार आहेत, तर कौशिकी चक्रवर्ती यांना ओजस अधिया तबल्यावर साथ देणार आहेत.