जॉब मिळाल्यानंतर नवस पूर्ण करण्यासाठी तरुणाने दिला स्वत:चाच बळी

प्रातिनिधिक

जॉब मिळविण्यासाठी देवाला केलेला नवस फळल्यानंतर एका तरुणाने चक्क स्वत:चाच बळी दिल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील नगरकॉईल येथे घडली आहे. नवीन असे त्या तरुणाचे नाव असून त्याला मुंबईतील एका बँकेत नोकरी लागली होती.

काही महिन्यांपूर्वी नवीन हा बेरोजगार होता. जॉब मिळत नसल्याने त्याला नैराश्य़ही आले होते. त्यात त्याने जॉब मिळण्यासाठी देवाला नवस केला होता. व त्यात त्याने बळी देणार असल्याचे बोलले होते. त्यानंतर महिनाभरातच नवीनला बँकेत नोकरी लागली व तो मुंबईला रुजू झाला. मात्र देवाला बोललेला नवस पूर्ण करणे गरजेचे असल्याने तो पंधरा दिवसांनी पुन्हा विमानाने नगरकॉईलला गेला. तिथे त्याने स्वत: रेल्वेखाली येत आत्महत्या केली. नवीनने एक सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात त्याने आपण नवस पूर्ण करण्यासाठी देवाकडे जात असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या