
सामना ऑनलाईन । मुंबई
असाईंमेंट्स, प्रोजेक्ट्स, सबमिशन्स यामधून ब्रेक घेत शीव (Sion) येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘TANTRA 2K19‘ या टेन्कोफेस्टचे आयोजन केले आहे. यंदा 28-29 मार्च रोजी हा फेस्टिव्हल साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दैनिक सामना सोबतच सामन ऑनलाईन म्हणजे saamana.com तंत्रा 2K19 चे डिजिटल पार्टनर असणार आहे. या इव्हेंटची सर्व माहिती, फोटो, व्हिडीओ, विजेते असे सर्व अपडेट तुम्हाला येथे पाहायला मिळतील.
‘तंत्रा’ या फेस्टिवव्हलचे आयोजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयातील विद्यार्थी जोशात फेस्टिव्हलच्या कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. तयारी जवळपास पूर्ण झाली असून सर्व कामांवर अखेरचा हात फिरवला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे.
पाहा फोटो गॅलरी: अशी झाली तत्रांची तयारी
यंदा अनेक नवनव्या इव्हेंट्सचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. तंत्रा 2k19 ची थीम ही प्रसिद्ध हॉलिवूड सिरीज ‘गेम ऑफ थ्रोन्स’ अशी असून यातील आयन थ्रोन देखील उभारण्यात आला आहे. तर या ‘थ्रोन’ वर बसायला येताय ना?
तंत्रा 2k19 मध्ये अनेक टेक्निकल व नॉन ‘टेक्निकल इव्हेंट्स’चा मिलाफ साधण्यात आला आहे. कोड-बिड, रोबो-रेस, कोड-स्वॅप, हॅकेथॉन, यांसारखे अनेक टेक्निकल इव्हेंट्स असून स्वॉर्ड फाईट, लेझर मेझ, जॉब-ऑन-द-वॉल, मोबाईल गेमींग- पबजी व मिनी-मिलीशीया, लॅन गेमींग, अशा नॉन टेक्निकल इव्हेंट्सना सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वेब डिझाइनिंग, द्रोणाचार्य तसेच ए.आई असे वर्कशॉप सुद्धा आयोजित करण्यात आले आहे.
यावेळचं प्रमुख आकर्षण म्हणजे मिस्टर अँड मिस तंत्रा, सर्वाधिक इव्हेंट्स जिंकणार्या एका मुला व मुलीला या टायटलने सन्मानित केलं जाईल व त्यासाठी विशेष बक्षिसही देण्यात येईल.



























































