
सामना ऑनलाईन । नागपूर
राज्यात सरोगसीबाबत अद्याप कायदाच अस्तित्वात नाही पण महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करून सरोगसीवर नियंत्रण ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री डाँ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली. सरोगसीबाबत शिवसेना आमदार सुनील प्रभू आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. एका विवाहित पुरुषाला दोन मुली होत्या पण त्याने अविवाहित असल्याचे बनावट शपथपत्र सादर करून सरोगेट आईच्या मदतीने पुत्रप्राप्ती केल्याचे निदर्शनास आल्याबाबत प्रश्नही उपस्थित केला होता. त्यावर जसलोक रुग्णालयात असा प्रकार उघडकीस आल्याचे लेखी उत्तरात मान्य केले आहे.




























































