पदक हुकले, पण मने जिंकली, टाटा मोटर्सकडून खेळाडूंना अल्ट्रोझ कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टाटा मोटर्सकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱया खेळाडूंना गौरविण्यात आले. प्रतिष्ठsच्या क्रीडा महोत्सवातील पदक थोडक्यासाठी हुकलेल्या 24 खेळाडूंना यावेळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये हिंदुस्थानी महिला हॉकी संघ (19 खेळाडू), गोल्फपटू अदिती अशोक, कुस्तीपटू दीपक पुनिया, महिला थाळीफेकपटू कमलप्रीत काwर, पुरुष बॉक्सर सतीश कुमार, महिला बॉक्सर पूजा रानी या खेळाडूंचा समावेश होता. टाटा मोटर्सची अल्ट्रोज या कारची चावी यावेळी या खेळाडूंना प्रदान करण्यात आली.

टाटा मोटर्सचे शैलेश चंद्र म्हणाले, टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी केलेल्या जबरदस्त कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. या खेळाडूंनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. देशातील असंख्य युवकांसाठी या सर्व खेळाडूंची कामगिरी प्रेरणादायक ठरणार आहे. भविष्यात हे खेळाडू देशासाठी आणखीनच छान कामगिरी करतील याचा विश्वास आहे, असेही शैलेश चंद्र यांनी आवर्जून नमूद केले.