टाटा मोटर्सचे ट्रक झाले स्मार्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टाटा मोटर्स देशातील पहिला सीएनजी-संचालित मेडियम अॅण्ड हेवी कमर्शियल व्हेईकल (एमअॅण्डएचसीव्ही) ट्रक लॉन्च करत पुन्हा एकदा नवीन ट्रकिंग इतिहास रचला आहे. तसेच पंपनीने ड्रायव्हिंग सोयीसुविधा वाढवण्यासाठी ‘अॅडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्ट्स सिस्टम’ (एडीएएस) सादर करण्यासोबत त्यांच्या प्राइमा, सिग्ना व अल्ट्रा ट्रक्सच्या सर्वाधिक विक्री होणाऱया श्रेणीमध्ये जागतिक दर्जाच्या वैशिष्टय़ांची भर घातली आहे. लॉन्चप्रसंगी बोलताना टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले, ‘‘आमचे ट्रक्स देशाला जोडतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात. उद्योग अग्रणी म्हणून आम्ही भविष्यासाठी सुसज्ज उत्पादने, सेवा व सोल्युशन्स सतत सादर करून कार्यक्षमता, उत्पादकता, कनेक्टिव्हिटी, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेचे नवीन प्रतिमान तयार करत आहोत. आज आम्ही लॉन्च करत असलेले ट्रक सुरक्षित वाहतुकीची वाढती गरज पूर्ण करतात.