
टाटा समूह आपल्या विस्तारा, एअर आशिया या एअरलाइन्स कंपन्यांचे एअर इंडियामध्ये विलीन करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे विस्तारा (ब्रॅण्ड) कंपनी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या विमान वाहतूक व्यवसायाला पुन्हा संजीवनी देण्यासाठी टाटा समूहाचे प्रयत्न सुरू आहेत. विस्तारा एअरलाइन्स ही टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्स (एसआयए) यांचा संयुक्त उपक्रम आहे. कंपनी संयुक्त संस्थेतील भागभांडवल आकाराचे मूल्यांकन करत आहे. सिंगापूर एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, एसआयए आणि टाटा समूह सध्याची भागीदारी अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करत आहेत. यासाठी विस्तारा आणि एअर इंडियाचे एकत्रीकरणही करता येईल.


























































