राज्यातील प्रवासी, मालवाहू वाहनांना वार्षिक करात ५० टक्के सवलत

435
प्रातिनिधिक

लॉकडाऊनमुळे अर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील प्रवासी व मालवाहू वाहनधारकांना वार्षिंक करात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे राज्यातील लाखो वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चअखेरपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात प्रवासी वाहतूक पुर्णतः बंद होती. तर, केवळ अत्यावश्यक कारणासाठी मालवाहतूक सुरु होती. व्यवसाय ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठा तोटा सहन करावा लागला. यामुळे परिवहन विभागाने वाहनधारकांना वाहन करात सुट द्यावी, अशी मागणी वाहतूक  संघटनांनी वेळोवेळी केली होती. या  पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वाहतूकदारांना दिलासा दिला असून  50 टक्के वार्षिक कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या वाहन मालकाने मागील वर्षाचा वार्षिक कर 31 मार्च पुर्वी भरणा केला असेल, अशाच वाहनधारकांना 50 टक्के करमाफीचा लाभ घेता येणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या