उच्च न्यायालयाजवळ दोन बसमध्ये टॅक्सीचे सँडविच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील चर्चगेट भागात उच्च न्यायालयाच्या इमारतीजवळ दोन बेस्ट बसमध्ये टॅक्सीचं अक्षरश: सँडविच झालं. शनिवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास काळी-पिवळी इको टॅक्सी दोन बेस्ट बसच्यामध्ये आली. पाठच्या बसने ठोकल्याने ही टॅक्सी दोन्ही बाजूने चेपली गेली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र टॅक्सीचं बरच नुकसान झालं आहे. पोलिसांनी टॅक्सीचालक आणि बेस्ट बस चालकाला ताब्यात घेतलं असून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.  प्रत्यक्षदर्शींनी अपघात पाठून धडक देणाऱ्या बेस्टचालकाच्या चुकीमुळेच घडल्याचं सांगितलं आहे.