निवडणूक प्रशिक्षण की शालान्त परीक्षेचे सुपरव्हिजन? 18 एप्रिलवरून शिक्षक पेचात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
teacher-1
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी, मुंबई

18 एप्रिलला दहावीची परीक्षा असून याच दिवशी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रशिक्षणाला जायचे की दहावीच्या परीक्षेचे सुपरव्हिजन करायचे अशा पेचात शिक्षक सापडले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई यांना 18 मार्चला प्रशिक्षण दिले जाणार आहे. पण यादिवशी दहावीची परीक्षादेखील आहे. शिक्षकांना परीक्षेच्या सुपरव्हिजनला जावे लागत असल्याने निवडणूक कामाच्या प्रशिक्षणाला अनेक शिक्षकांना उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे प्रशिक्षणाची तारीख बदलण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.

प्रशिक्षणाला दांडी मारल्यास गुन्हा दाखल होणार
निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे निवडणूक प्रशिक्षणाच्या आदेशामध्ये म्हटले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. सुपरव्हिजनला न गेल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान आणि निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारल्यास कायदेशीर कारवाई त्यामुळे शिक्षकांसमोर नेमके काय करायचे असा प्रश्न उपस्थित झाल्याचे शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदे यांनी सांगितले.