अनुदानासाठी शिक्षकांचा शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मुकमोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज राज्य महासंघाच्या आदेशानुसार लातूर, धाराशिव, नांदेड या तीन जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने टाऊन हॉल येथून दुपारी 3 वाजता मूक मार्चाला सुरूवात झाली. हजारो शिक्षक एकत्र येऊन विविध मागण्यांचे फलक शिक्षकानी आनले होते. मूक मोर्चा शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडकला. मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक संजय यादगीरे यांना देण्यात आले.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रमुख मागण्या त्यात विनाअनुदानित मुल्यांकन पात्र कनिष्ठ महाविद्यालास अनुदानपात्र घोषित करावे, जुनी पेन्शन योजना लागु करावी, 02 मे 2012 पासूनच्या प्रलंबित वैयक्तिक मान्यता द्याव्यात व शालार्थमध्ये नावे समाविष्ठ करावीत. वाढीव पदांना मान्यता द्यावी. अशा 32 मागण्याचे निवेदन शिक्षण उपसंचालक,लातूर यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सहभागी झाले होते.