सुट्टीदिवशी शिक्षकांनी निवडणुकीचे काम करावे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
voter1

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

शिक्षकांना सुट्टीच्या दिवशी किंवा इतर काम नसताना निवडणुकीशी संबंधित काम देण्यास हरकत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती ए. एम. ढकळे यांनी नोंदवले. निवडणुकीचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा आदेश रद्द केला.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नगरचे जिल्हाध्यक्ष संजय मोहन शेळके आणि इतर सहा शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकर सोपविलेले बूथ लेक्हल ऑफिसरचे काम करण्यास त्यांनी नकार दिला होता. यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी या शिक्षकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला संजय शेळके यांनी खंडपीठात आक्हान दिले. शैक्षणिक काम सोडून निवडणुकीचे कामे करणे त्यांना शक्य होत नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २००८ मध्ये दिलेल्या एका निकालात स्पष्ट केले आहे, की शिक्षकांना निवडणुकीचे काम शक्यतो सुट्टीच्या दिवशी किंवा त्यांच्याकडे शैक्षणिक काम नसल्यासच देण्यात यावे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याचा दिलेला आदेश यामुळे चुकीचा ठरतो, असेही याचिकेत म्हटले होते. खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधारे, शिक्षकांना सुट्टीच्या दिवशी किंवा इतर काम नसताना निनडणुकीशी संबंधित काम देण्यास हरकत नाही, असे मत नोंदविले आणि याचिकाकर्त्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत असे आदेश देत याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. सिद्धेश्कर ठोंबरे तर निवडणूक आयोगातर्फे ऍड. आलोक शर्मा यांनी काम पहिले.