मोठ्या पडद्यावर पुन्हा हसवणार महाराष्ट्राचे ‘भाई’; पाहा टीझर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. पुलंच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. पुलंची नाटकं, त्यांची पुस्तकं हे वाचून हसू आलं नाही, असा वाचक विरळाच. पण आता खुद्द पुलच मोठ्या पडद्यावर आपल्याला हसवताना दिसणार आहेत. भाई, व्यक्ती की वल्ली? असं या चित्रपटाचं नाव आहे.

महेश मांजरेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षक पुन्हा एकदा पुलंचं लेखक, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, निवेदक, गीतकार आणि अभिनेते असं बहुआयामी व्यक्तिमत्व अनुभवू शकणार आहेत. पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर या चित्रपटाचा टीझर यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला.

‘भाई…’ 4 जानेवारी 2019 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटामध्ये ‘हंटर’ आणि ‘वायझेड’ फेम अभिनेता सागर देशमुख या पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. तर इरावती हर्षे यामध्ये सुनिताबाई म्हणजेच पुलंच्या पत्नीच्या भूमिकेत पहायला मिळतील.

पाहा टीझर-

summary- teaser of bhai vyakti ki valli has release