‘मिशन मंगल’चा टीझर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अक्षय कुमार अभिनित मिशन मंगल या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरची लांबी जवळपास 45 सेकंद आहे. चित्रपटाच्या सर्व कलाकारांसह या चित्रपटाच्या संहितेला दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात तापसी पन्नू, शर्मन जोशी, विद्या बालन, कीर्ती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अक्षय कुमार याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा टीझर शेअर केला आहे. मिशन मंगल या चित्रपटाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं आहे.