
दैनंदिनी व्यवहारांतील विविध नियमांमध्ये उद्या 1 जूनपासून महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. बँकिंग, विमान प्रवास, इन्कम टॅक्स, गॅस सिलेंडर, चेक पेमेंट, गुगल फोटोज यात नव्या नियमांचा समावेश होणार आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहेत. अशाच नव्या बदलांचा घेतलेला हा आढावा…
यू-टय़ूबर्सना भराका लागणार टॅक्स
यू-टय़ूबकर व्हिडिओ अपलोड वरून झटपट पैसे कमावणाऱयांना आता फटका बसणार आहे. कंटेट क्रिएटर्सना यू-टय़ूब व्हिडिओच्या माध्यमातून होणाऱया कमाईवर यापुढे टॅक्स भरावा लागणार आहे. यात केवळ त्याच ह्युजसाठी टॅक्स भरावा लागेल जे अमेरिकी व्हुवर्सकडून मिळाले आहेत.
गुगल फोटोजवर मर्यादा
जगभरातील कोटय़वधी युजर्स गुगल फोटोज या ऍप्लिकेशनचा वापर करतात. 1 जूनपासून गुगल प्रत्येक अकाऊंटला एकूण 15 जिबी क्लाऊड स्टोरेज देणार आहे. त्यात गुगलच्या सर्क प्रॉडक्टमधल्या डेटाचा म्हणजेच जी-मेल, गुगल डॉक्स, शीट्स, ड्राइव्हज आणि अन्य सेकांचा समावेश आहे. 15 जिबीपेक्षा जास्त स्टोरेजसाठी आता गुगल कनचे सबक्रिप्शन घ्यावे लागेल. त्यात 100 जिबीच्या स्टोरेजसाठी वर्षाला 1300 रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे.
आयटी रिटर्नसाठी नवे संकेतस्थळ
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणाऱयांसाठी 7 जूनपासून नवी वेबसाईट लॉंच होणार आहे. त्यामुळे 1 ते 6 जून या कालावधीत करदात्यांना इन्कम टॅक्सचे जूने पोर्टल बंद असणार आहे. या कालावधीत वेबसाईटमधील बदलांची प्रक्रिया सुरू असेल. नव्या साईटमध्ये अनेक ऍडकान्स फिचर असणार आहेत. त्यामुळे आयटीआर फाईल करणे सोपे होणार आहे. 7 जूनपासून http://INCOMETAX.GOV.IN ही वेबसाईट असेल.
चेक पेमेंटच्या नियमांत बदल
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बॅंक ऑफ बडोदाने जूनपासून ‘पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन’ बंधनकारक केले आहे. या अंतर्गत ग्राहकाने चेक जारी केल्यानंतर बॅंकेला संपूर्ण माहिती देणे बंधनकारक असेल. चेक पेमेंट करण्याआधी बॅंक ही माहिती क्रॉस चेक करेल. यात काही गोंधळ आढळल्यास चेक रिजेक्ट होईल. तसेच कॅनरा बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यापासून आयएफएससी कोड बदलणार आहे. सिंडिकेट बॅंकेने नवीन आयएफएससी कोड 30 जूनपर्यंत अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
स्कस्तात फोर-जी स्मार्टफोन
आयटेल, रिलायन्स जिओसह मिळून आपला ए-23 प्रो हा फोर-जी स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी देणार आहे. 4999 रुपयांचा हा स्मार्टफोन आता अवघ्या 3899 रुपयांत खरेदी करता येईल. फोनच्या खरेदीसह युजरला तीन हजार रुपयांचा रिचार्ज बेनिफीटदेखील मिळणार आहे. हे क्हाऊचर रिडीम करण्यासाठी जिओ नंबरवर केवळ 249 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.
एलपीजी गॅसचे दर
दर महिन्याच्या एक तारखेला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल करतात. एलपीजी सिलेंडरचा दर सध्या 810 रुपयांकर गेला आहे. एलपीजी गॅसच्या किमतीतदेखील बदल होऊ शकतात, काही वेळा या किमतीदेखील स्थिर राहतात.
विमान प्रवास महागणार
एकीकडे महागाईमुळे सर्कसामान्य जनता आधीच त्रस्त असताना दुसरीकडे उद्यापासून देशांतर्गत विमान प्रवास करणाऱया प्रकाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. प्रवाशी संख्येत घट, आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध, इंधन दरवाढ यामुळे विमान कंपन्या प्रचंड तोटय़ात आहेत. त्यातून त्यांना बाहेर वाढण्यासाठी देशांतर्गत तिकिटांच्या दरात 13 ते 16 टक्के वाढ होणार आहे. 40 मिनिटांच्या विमान प्रवासाचे भाडे 2300 रुपयांवरून आता 2600 रुपयांवर पोहोचणार आहे, तर 180 ते 210 मिनिटांपर्यंतच्या प्रवासासाठी आता 7600 रुपयांऐवजी 8700 रुपये मोजावे लागतील.



























































