
देशातील कोट्यवधी जनतेचं श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिरावर एका नायब तहसीलदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर सदर तहसीलदारावर संताप व्यक्त केला जात असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
या तहसीलदाराचं नाव हिंमत बहादूर असं असून ते सेवराईचे तहसीलदार आहेत. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते राम मंदिरावरून वक्तव्यं करताना दिसत आहेत. ते म्हणतात की, मंदिर या शब्दाचा अर्थ मन आणि दिल (हृदय). जे लोकांनी बनवलं आहे, त्याला मंदिर म्हणता येणार नाही. देव आपल्या सगळ्यात आहे. देव मंदिरात नाही. देव आणि श्रद्धा आपल्यात आहेत. मी जाहीरपणे हे सांगतो की, मंदिरात पूजा करणारे मूर्ख आहेत. मंदिर हे अन्य दुसरं काही नसून फक्त दुकानदारी आहे, असं विधान ते या व्हिडीओत करताना दिसतात.
गाजीपुर: सेवाराई के नायब तहसीलदार हिम्मत बहादुर का यह वीडियो वायरल हो रहा है। नायब तहसीलदार साहब मंदिर जाने वाले लोगों को बेवकूफ कह रहे हैं और अयोध्या में राम मंदिर को दुकानदारी बता रहे हैं। pic.twitter.com/3j3x2GdPz4
— Gaurav Shukla (@shuklaagaurav) January 19, 2023
या व्हिडीओवर संताप व्यक्त करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या व्हिडीओच्या चित्रीकरणावेळी हिंमत यांच्या आसपासची मंडळी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण कोणालाही घाबरत नसल्याचंही हिंमत या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतात.



























































