तेलंगणाच्या विद्यार्थीनींनी तयार केले पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड्स तयार केले आहेत. श्न्यू कचरा संकल्पनेवरील या सॅनिटरी पॅड्सला स्त्री रक्षा पॅड्स असे नाव दिले आहे.

सध्या बाजारात मिळणाऱ्या सॅनिटरी पॅड्स सहज विघटन होत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी मुल्कलपल्ली जिल्हा परिषद हायस्पूलच्या मुलींनी ऑर्गेनिक पॅड्सचा पर्याय शोधला आहे. त्यासाठी सुवासिक फुले, मेथी, हळद, कडुलिंग, सब्जा यांचा वापर केला आहे. याविषयी अधिक माहिती देताना स्वाती नावाच्या विद्यर्थिनीने म्हटले,  ‘सॅनिटरी वेस्ट’ वर तोडगा काढण्यासाठी ऑर्गेनिक पॅड्सची संकल्पना अंमलात आणली आहे. सध्याच्या अनेक कंपन्या पेट्रोलियम केमिकल्सचा वापर करतात. त्यांच्यामुळे साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते.  तसेच त्यांच्या विघटनाला दीर्घकाळ लागतो. म्हणून आम्ही कडुलिंबाची पाने, मेथी यांची पेस्ट करून बेस तयार केला. त्यावर मेथी आणि सब्जाचे बी चिकटवून कापसाच्या पट्टय़ांमध्ये ठेवले.