खराडी परिसरातील टेम्पो चोरून नेणाऱ्यास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खराडी परिसरात उभा असलेला टेम्पो चोरून नेणाऱ्यास चंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. कमलेश बाळासाहेब दाणे (वय 22, रा. नारायण डोह, नगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार सलमान शेख पसार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश यांनी त्यांचा टेम्पो खराडीतील मॉल समोर उभा करून येरवडा येथील त्यांच्या नातेवाईकांकडे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करून त्यांच्या नातेवाईकांसोबत परत कारमधून खराडी येथे येत असताना त्यांचा टेम्पो चोरून दोघेजण जात असल्याचे दिसले. त्यांनी मोटारीतून त्यांचा पाठलाग करून टेम्पा अडविला. त्यावेळी टेम्पोमधून उतरून दोघेजण पळाले. त्यावैकी कमलेश याला पकडण्यात आले आहे. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांच्या आधारे दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस अधिक तपास करत आहेत.