सिद्धीविनायक न्यासही अनुभवणार ‘ठाकरे’चा रोमांच, आज विशेष शो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
thackeray-siddhivinayak

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉक्स ऑफिवर सध्या चर्चा सुरू आहे ती हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित भव्य चित्रपट ‘ठाकरे’ चित्रपटाची. प्रदर्शनाच्या दिवशी बहुतांश शो हाऊसफुल्ल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही ‘ठाकरे’ चित्रपट जबरदस्ती गर्दी खेचत आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाचा हाच रोमांच आज प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे कर्मचारी आज अनुभवणार आहेत. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी शिवसेना सचिव आणि सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचे भव्य जीवन अनुभवणे ही एक सुवर्णसंधी आहे. म्हणूनच त्यांच्या जीवनाची खरी ओळख करून देणारा, त्यांचा संघर्ष मांडणारा असा हा भव्य चित्रपट पाहण्यापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून सिद्धीविनायक न्यास कर्मचाऱ्यांसाठी आज भांडुप येथील नेपच्युन चित्रपटगृहात संध्याकाळी 5:30 वाजता विशेष शो आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आदेश बांदेकर यांनी सामना ऑनलाईनसोबत बोलताना दिली. या शोसाठी आपणही उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणका उडवून दिला आहे. समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. अभिनेता नवाझुद्दीनने शिवसेनाप्रमुखांची भूमिका साकारण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही, अशाच प्रतिक्रिया येत आहेत.