
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपट आजपासून प्रदर्शित झाला. रत्नागिरीतील सिटी प्राईडमधील बारा वाजता चित्रपटाचा पहिला खेळ शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत व उपनेते म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी आरक्षित केला होता. रत्नागिरीतील पहिल्याच खेळापासून ‘हाऊसफुल्ल’चा फलक चित्रपटगृहाबाहेर झळकला आहे.
ढोल-ताशांचा गजर, नाशिकमध्ये ‘ठाकरे’ चित्रपटाचे दणक्यात स्वागत
नगरमध्ये ‘THACKERAY’चा जयघोष, फर्स्ट शो हाऊसफुल
चित्रपट पाहाताना जुन्या शिवसैनिकांच्या आठवणी ताज्या झाल्या. शिवसेनेच्या जडणघडणीचा थरारक प्रवास पहाताना प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभा राहिला. चित्रपटातील संवाद आणि दृश्यांना टाळ्याचा कडकडाट मिळाला.
ठाकरे चित्रपटाचे नांदेडमध्ये जंगी स्वागत
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केले आहे. रत्नागिरी शिवसेनेच्या वतीने 25 ते 27 जानेवारी दरम्यान ‘ठाक’रे चित्रपटाचे मोफत खेळ आयोजित केले आहेत. शुक्रवारी दुपारी बारा वाजता सिटी प्राईड येथील पहिला खेळ शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाला. यावेळी उपनेते म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, महिला आघाडी संघटक शिल्पा सुर्वे, सभापती प्रकाश रसाळ, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, शहर संघटक मनिषा बामणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.




























































