आम्ही बाहेर येणे चमत्कारच, गुहेत अडकलेल्या मुलांनी व्यक्त केल्या भावना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बँकॉक

थायलंडमधील ‘थाम लुआंग’ गुहेत अडकलेली बारा मुले आणि त्यांचे प्रशिक्षक यांना प्रचंड प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुटका झाल्यानंतर आठवडाभरापासून रुग्णालयात उपचार घेत असलेली ती मुले आणि त्यांचे प्रशिक्षक पहिल्यांदाच सर्वांसमोर आले. यावेळी या सर्व मुलांनी उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते तसेच थायलंडच्या परंपरेनुसार या मुलांनी हात जोडून नमस्कार केला.

आपत्ती व्यवस्थापन, थायलंड आणि हिंदुस्थान

पत्रकारांशी संवाद साधताना अदुल सॅम या १४ वर्षीय मुलाने, ‘आम्ही गुहेतून बाहेर येणे एक चमत्कार आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. बचाव कार्य करणारी यंत्रणा आमच्यापर्यंत कधी पोहोचेल हे आम्हाला माहीत नव्हते. त्यामुळे गुहेतून बाहेर पडण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत होतो, असे प्रशिक्ष एक्कापोल चांटवाँग यांनी सांगितले. तसेच बचाव यंत्रणा आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत आम्ही खडकामधून येणारे पाणी पिऊन दिवस काढल्याचे एका मुलाने सांगितले.

२३ जूनपासून ही मुले गुहेमध्ये बेपत्ता झाली होती. नऊ दिवसांनी ३ जुलैला ब्रिटीश पाणबुडयांनी या मुलांना शोधून काढले होते. बुधवारी या मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकार परिषदेत सर्वांसमोर आणण्यात आले. त्यावेळी डॉक्टर, नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता.