सहलीला गेलेला मुलगा वडिलांना 10 वर्षांनी तुरुंगात भेटला

सामना ऑनलाईन । थायलंड

काही दिवसांपूर्वी सोशल साईटवर एका नातीचा आजीबरोबरचा फोटो व्हायरल झाला होता. शाळेची सहल वृद्धाश्रमात गेली असता तिथे आजीला बघून नातीला धक्का बसला. त्या घटनेचा हा फोटो होता. या घटनेशी साम्य असलेली घटना थायलंडमध्ये घडली आहे. थायलंडमधील रेयाँग येथील तुरुंगात शाळेची सहल गेली होती. तिथे एका विद्यार्थ्याला आपले वडील दिसले. 10 वर्षानंतर वडिलांना बघून तो भावूक झाला आणि त्यांच्या पायावर नतमस्तक होत तो हमसाहमशी रडू लागला. पिता-पुत्राच्या भेटीचा हा व्हिडीओ सोशल साईटवर व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी या मुलाच्या शाळेची सहल रेयॉंग येथील तुरुंगात गेली होती. तेथील वातावरण, कैद्यांची मानसिकता, गु्न्हेगारी याबदद्ल विद्यार्थ्यांना कळावे यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. पण तिथे वडिलांना बघून एक विद्यार्थी ढसाढसा रडू लागला. शिक्षकांनी त्याला याबदद्ल विचारले असता त्याने तिथे असलेल्या एका कैद्याकडे बोट दाखवत ते आपले वडील असल्याचे सांगितले. पण तो कैदी मात्र हा आपला मुलगा नसल्याचेच सांगत होता. अखेर शिक्षकांनी त्या कैद्याला खरे काय ते सांगायची विनंती केली. त्यानंतर माझा मुलगा हा कैद्याचा मुलगा असल्याचे त्याच्या मित्रांना कळू नये. नाहीतर ते त्याला त्रास देतील म्हणूनच आपण ओळख दाखवत नसल्याचे कैद्याने सांगितले. हे ऐकताच मुलाने धावत जाऊन वडिलांच्या पायावर लोळण घेतली व तो ढसाढसा रडू लागला. पिता-पुत्राची ही भेट बघून तिथे उपस्थित असलेल्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात कैद्याने मुलांना कधीही चुकीचे काम न करण्याचा सल्ला दिला आहे.

summary-son meeet father in jail

आपली प्रतिक्रिया द्या