सियाराम चषक; अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या वतीने सियाराम चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री माननीय मंगल प्रभात लोढा, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, सियारामचे सर्वेसर्वा श्री रमेशजी पोद्दार, CCI च्या अध्यक्षा सौ. लिमये यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे डायरेक्टर अर्जुन मुद्दा, दिनेश मुसळे, शाम मखारिया हानिफ शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेचा सुरुवातीचा सामना महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली या दोन संघांमध्ये रंगला. पहिल्या सामन्यात महाराष्ट्राच्या संघांने विजयी सलामी दिली तर दुपारच्या सत्रात कर्नाटकने मध्ये प्रदेशचा धुव्वा उडवला. ‘ब’ गटातील सामन्यांमध्ये गुजरातने राजस्थानचा तर गोव्याने उत्तर प्रदेश संघाचा पराभव करत विजयी सुरुवात केली.