‘द डिसायपल’, ‘बिटरस्वीट’ बुसान चित्रपट महोत्सवात!

लॉकडाऊनमुळे गेली सहा महिने चित्रपटगृहे बंद असली तरी चित्रपटसृष्टीसाठी आता दिलासादायक बातमी आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चैतन्य ताम्हाणेच्या ’द डिसायपल’सह अन्य सात हिंदुस्थानी चित्रपटांची निवड झाली आहे.

दक्षिण कोरियातील बुसान चित्रपट महोत्सवाचे यंदाचे 25 वे वर्ष आहे. बुसानमध्ये 21 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत हा महोत्सव पार पडणार आहे. यंदाच्या महोत्सवात 68 देशांमधील 192 चित्रपट सहभागी होणार आहेत. व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेसह क्रिटीक्स पुरस्कार पटकावणारा ’द डिसायपल’ पुन्हा एकदा या महोत्सवात आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. याशिवाय इम्रान हाश्मीचा ’हरामी’, अनंत महादेवन यांचा ’बिटरस्कीट’, बंगाली चित्रपट ’कॅपटिक’, ’ए अवर’, ’मील पत्थर’, ’मट्टो का साईकल’, कन्नड भाषेतील चित्रपट ’पिंकी एली’ आदी चित्रपटांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या