
सामना प्रतिनिधी । पिंपरी
तरुणीला पॉर्न साईटवर मोबाईल नंबर टाकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ डिसेंबर रोजी आकुर्डी येथे हा प्रकार घडला. प्रवीण पांडुरंग जाधव (रा. मानाईक तांडा, लोहा, जि. नांदेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी नोकरी करत असून, आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठविले. त्याचप्रमाणे पीडित तरुणीचा मोबाईल नंबर पॉर्न साईटवर टाकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला.































































