महापालिकेच्या गाईड्स पथकाला पथसंचलनात दुसरा क्रमांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आलेल्या पथसंचलनात मुलींच्या गाईड पथकाने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील स्काऊट व गाईड पथकांनी या संचलनात भाग घेतला होता. गाईडने शालेय गटात ही उत्कृष्ट कामगिरी केली. प्रजासत्ताक दिनी पथसंचलन समारंभात मुंबई महापालिकेच्या शाळांमधील ‘भारत स्काऊट आणि गाईड’ यांनी सहभाग घेतला होता. या संचलन समारंभात उत्कृष्ट संचलन करणाऱया पथकांची सर्वोत्कृष्ट पथक म्हणून निवड केली जाते. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये स्काऊट आणि गाईड मिळून एकूण 25 हजार 857 विद्यार्थी आहेत.