दुचाकीची उसाच्या उभ्या ट्रॉलीला धडक, दोन तरुण ठार; एक जखमी

माजलगाव येथील गेवराई रोडवर केसापुरी कँम्पजवळ उसाने भरलेल्या उभ्या ट्रॉलीला दुचाकीने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण ठार, तर एक जखमी झाल्याची घटना 19 फेब्रुवारीला रविवारी रात्री अकराच्या दरम्यान घडली.

माजलगावकडून दुचाकीवरून केसापुरी कॅम्पकडे जात असलेल्या दुचाकीची उसाने भरलेल्या उभ्या ट्रॉलीला धडक बसली. यामध्ये रविराज रामहरी शेंडगे (20) रा.उमरी, विवेक भागवत मायकर (21) पिंपळगाव (नाकले) या दोन तरुणांचा अपघात होऊन त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले, तर ओंकार काळे हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेने माजलगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या