आदर्श अनसरवाडा गावातील विहीर गेली चोरी

148
प्रातिनिधिक फोटो

औराद शहा । अनसरवाडा

सांसद आदर्श ग्राम दत्तक गाव अनसरवाडा येथे अनेक दशकापासून पाण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागते. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गावात वेगवेगळ्या भागात ग्रामपंचयतीचे एकूण ४ आड (विहीर) आहेत अशी ग्रामपंचायतला नोंद आहे. पण प्रत्यक्ष पाहणी केली असता ३ आड दिसून आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील लोहार गल्लीमध्ये पिण्याच्या पाण्याचा आड होता व नागरिक तेथून पाणी घेऊन जात असत. तसेच त्या आडाची ग्रामपंचायतला नोंदही आहे. पण गेल्या काही वर्षापासून त्या जागी आडच दिसत नाही. त्यामुळे गावात सर्वत्र सार्वजनिक आड (विहीर) चोरीला गेल्याची चर्चा सुरु आहे.

ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच विद्यमान पंचायत सममितीचेचे सभापती अजित तुकाराम माने यांनीच त्यावेळी आडाची नोंद ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला केली आहे, अशी माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. ती विहीर शोधून द्या अशी मागणी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर राजु भरगांडे, महेश भरगांडे, सुनील भरगांडे, गोविंद कुंभार, भागवत कुंभार, लहु बडगीरे, वामन वरवटे, मनोज बडगीरे, नयन धनराज माने, हारीभाऊ भरगांडे अदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या