युद्ध पेटले! जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर; जगातील 10 देश आमने-सामने

बांगलादेशात गृहयुद्ध पेटले आहे. ब्रिटनमध्येही परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. ब्रिटनच्या रस्त्यावर हिंसक जमाव आणि दुकानांना लावलेल्या आगीचे फोटो जगभरात व्हायरल होत आहेत. साऊथ पोर्ट येथे झालेल्या चाकू हल्ल्यात तीन मुलांचा मृत्यू झाला. हल्लेखोर इमिग्रंट मुस्लिम होता. त्यामुळे इमिग्रंट नागरिकांविरोधात विरोधाची लाट दिसून येत आहे. या हिंसाचारात 100 हून अधिक लोकांना अटक झाली.

जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. इस्रायल – हमास, रशिया – युक्रेनसह अनेक देशांमध्ये युद्ध सुरू आहे. 10 देशांमध्ये अस्थिर वातावरण आहे. त्याचा परिणाम दुसऱ्या देशांवरही होत आहे. परिणामी सप्लाय चेन विस्कळीत झालीय. महागाई वाढलीय.

युक्रेन विरुद्ध रशिया

युक्रेन – रशिया युद्ध दोन वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू आहे. कुणीही माघार घ्यायला तयार नाही. अशातच युक्रेनला अमेरिकेकडून एफ 16 फायटर जेट मिळाले आहेत, तर अनेक भागांत रशियाने आपली पकड मजबूत केली आहे. अमेरिकेकडून मिळालेल्या मदतीमुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की खूश आहेत. नाटो देशांनी आणखी मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

इस्रायल – हमासची परिस्थिती

युद्धात 40 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय. गाझा पट्टीत इस्रायल जोरदार हल्ले करत आहे. पॅलेस्टिनीही उत्तर देत आहे.

लेबनान- इस्रायल तणाव

मध्यपूर्वेला लेबनान तणावाचे केंद्र बनले आहे. हिजबुल्लाहचे टॉप कमांडर फुआद शुक्रच्या मृत्यूनंतर इस्रायल – लेबनानचा संघर्ष शिगेला पोहोचलाय. हिजबुल्लाहने केलेल्या हल्ल्यात इस्रायली मुलांचा मृत्यू झाला. त्याचा बदला घेताना इस्रायलने लेबनानविरोधात रणशिंग फुंकले आहे.

इराण तापले

लेबनानमध्ये हिजबुल्लाह प्रमुख आणि इराणमध्ये हमासप्रमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर युद्धाने नवे वळण घेतले आहे.