सेलू-जवळगा येथे दोन घरे फोडली; 2 लाख 27 हजारांचा ऐवज लांबवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालूक्यातील मौजे सेलू जवळगा येथील दोन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. तसेच एक मोटारसायकलही पळवली. तब्बल 2 लाख 27 हजार 150 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे.

रेणापूर पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी राजाभाऊ विश्वंभर जाधव (रा. जवळगा ता. रेणापूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोने, चांदीचे दागीने, रोख रक्कम असा 1 लाख 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला. त्याचप्रमाणे बाबासाहेब रामराव चित्ते (रा. सेलू) यांच्या घरातील सोन्याचे, चांदीचे दागीने व रोख रक्कम असा 59,250 रुपयांचा ऐवज पळवण्यात आला. सेलू येथील आकाश शिवाजी जाधव यांची दुचाकीही चोरट्यांनी पळवली. रेणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माचेवाड करीत आहेत.